झटका चटणी

साहित्य :-DSC05672

१)      एक मोठा लसणाचा गड्डा

२)     एक वाटी सुक्या लाल मिरच्या

३)     सुक्या खोबऱ्याचा कीस अर्धी वाटी

४)     दोन चमचे खाण्याचे पोहे

५)    डाळीचं पीठ

६)      एक चमचा जिरं

७)    दोन चमचे धने

८)     एक चमचा साखर

९)      आवडत असल्यास पुदिन्याची पानं

१०)  पाव वाटी तेल

११)   पाव वाटी शेंगदाणे

१२)  चवीनुसार मीठ . 

कृती :-

१)      लसूण , खोबऱ्याचा कीस , शेंगदाणे , मीठ आणि मिरच्या (मिरच्यांऐवजी     लाल तिखट घातलं तरी चालेल .) जिरं , धने , साखर , मीठ  घालून मिक्सरमध्ये जाडसर वाटावं . 

२)     अर्धवट वाटून झाल्यावर त्यात डाळीचं पीठ घालावं .  परत जाडसर होईपर्यंत फिरवून घ्यावं .   

३)     कढाईत तेल तापत ठेवावं .  तेल तापल्यावर त्यात मोहरी आणि कुटलेली चटणी घालावी .  मंद आचेवर दहा-बारा मिनिटं परतावं .  खमंग भाजावं . 

४)     गार झाल्यावर चटणी बरणीत भरावी .  ही चटणी बरेच दिवस टिकते .  प्रवासातही उपयोगी पडते .