झटपट मूग आणि पालक

साहित्य :-spinachmoongdalfry

१)      चिरलेला पालक

२)     त्या प्रमाणात मुगाची डाळ

३)     टोमाटो बारीक चिरून

४)     लाल मिरची , तेल

५)    जिरं , हिंग

६)      आलं-लसूण पेस्ट एक चमचा

७)    हवा असेल तर कांदा बारीक चिरून

८)     चवीनुसार मीठ .

कृती :-

१)      कुकरमध्येच तेल गरम करून जिरं , हिंग , लाल मिरची , आलं-लसूण पेस्ट , कांदा टाकून परतावं . 

२)     कांद्याचा रंग बदलला की टोमाटो टाकून जरा परतावं .  पालक टाकावा .

३)     मूग डाळ टाकून मीठ , गरम मसाला टाकून कुकरच्या दोन-तीन शिट्ट्या दिल्या की पुरे !  (उत्तर भरतात पालक-मूग तशी घट्ट असते व डाळ ठेचत नाहीत .  पराठे आणि चावल दोन्हीबरोबर चालते .  पालक नसेल तर मेथी , चवळी , राजगिरा , माठ अशीही भाजी चालते .)