झुंझार वादळाचा अस्त …!
|अतिशय प्रतिकूल परिस्थितून आपला राजकीय प्रवास करत ,गृहमंत्री,उप मुख्यमंत्री पासुन देशाच्या ग्रामविकास मंत्री पदापर्यंत जाऊन पोचलेल्या गोपीनाथ मुंडे साहेबांचा कार अपघातात मृत्यू झाला. आणि बघता बघता सबंध महाराष्ट्र पोरका झाला.
सर्वसामान्य कुटुंबाचा वारसा असलेल्या,आणि आपल्या ताकदीच्या जोरावर राजकीय वैभव उभं करणारा झुंझार नेता,शेतकऱ्यांचा नेता,सर्व सामन्यांचा नेता,एक उत्कृष्ट वक्ता आज आपल्यातुन गेला.
लोकसभा निवडणुकीतील यशानंतर त्यांच्या कर्मभूमीत अर्थात बीडमधील परळीमध्ये आज संध्याकाळी गोपीनाथ मुंडेंचा नागरी सत्कार होणार होता. मात्र मुंडेंच्या अपघाताची बातमी कळल्यानंतर परळीमध्ये शोकाकुल वातावरण झाले,
भाजपचे नेते केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्यांचे
रुग्णालयात सकाळी 8 वाजता निधन झाले.
रुग्णालयात सकाळी 8 वाजता निधन झाले.