झोप येत नसल्यास करा उपाय

cant sleepतुम्हाला झोप येत नसल्यास तुमच्या आहारामध्ये बदल करत राहिल्यास तुमच्या झोपेच्या समस्या दूर होतील. झोप पूर्ण न झाल्यास आळस येणे, चिडचिडपणा वाढणे, कंटाळा येणे आदी समस्या उद्भवतात. यासाठी जर तुम्हाला झोप आली पाहिजे तर करा हे उपाय.

1.फिश, अंडी, अक्रोड किंवा भोपळय़ाच्या बिया आदीच्या सेवनामुळे तुमचा तणाव दूर होतो व शरीर रिलॅक्स होते      आणि तुम्हाला झोप येते.

2.फळे, सुका मेवा, काकडी, टोमॅटो, रताळे आदीच्या सेवनाने शरीरात पाण्याचे संतुलन राहते. तसेच रक्तदाबही नियंत्रित राहून झोप येण्यास मदत होते.

3.काजू, दही, लोणी, बदाम, टोमॅटो आदीच्या सेवनामुळे शरीरावरील ताण कमी होतो.

4.शेंगभाज्या, मटण यात लोह असते. शरीरातील लोह कमी झाल्यास चक्कर येणे, इन्सोमेनियाचा त्रास होणे आदी समस्या उद्भवतात.

5.पालेभाज्या, गाजर, शेंगभाज्या, डाळी, चॉकलेट, केळी, धान्य इ गोष्टी आहारात असल्यास आपल्याला मॅग्नेशियम मिळते. त्यामुळे झोप न येण्याच्या समस्येसह उच्च रक्तदाब आणि डोकेदुखीची समस्याही दूर होते.

अशा प्रकारच्या आपल्या आहारातील बदलामुळे आपल्याला झोप लागू शकते. झोप पूर्ण झाल्यास तुमचे डोके शांत राहते. तुमची कामे पटापट होतात. त्यामुळे तुमची चिडचिडही होत नाही. त्यामुळे अशा प्रकारचा आहार सेवन करा.

 

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *