टाकळ्याची भाजी

thotakuracurry

साहित्य :-

१)      टाकळ्याचा कोवळा पाला तीन वाटया

२)     भिजवलेली मुग डाळ पाव वाटी

३)     कांदे दोन वा लसूण

४)     मीठ , तिखट

५)    खोबरं , गुळ .

कृती :-

१)      टाकळ्याचा पाला मधला देठांचा , काड्यांचा भाग नीट काढून बारीक चिरावा .

२)     भिजवलेली मुग डाळ व कांदे बारीक चिरून फोडणीला टाकावेत .  ते चांगले परतून त्यावर टाकळ्याचा पाला घालून परतावा .

३)     चवीला मीठ , गुळ , तिखट , ओलं खोबरं घालून मंदान्गीवर शिजू द्यावं .

४)     आवश्यक तेवढाच पाण्याचा हबका मारून वाफ काढावी .

५)    या सर्व भाज्या शिजवताना वर झाकण ठेवावं .  म्हणजे जीवनसत्व नष्ट होत नाहीत .

६)      वाफेच्या पाण्यावर भाजी मुरत शिजते .  चव वाढते .  पालेभाज्या आळून कमी होतात , तेव्हा मीठ त्या प्रमणात घालावं .