टाकून देऊ नका साल .

fruit peelबर्‍याच फळांची सालं काढून टाकली जातात. मात्र यामुळे जरुरी पोषक तत्त्वांचा लाभ मिळत नाही. उदा. बदामाचं साल अँटीऑक्सिडंटचा खजिना आहे. यामध्ये पॉलिफिनोल्स असतात ज्यामुळे हृदयाला बळकटी मिळते आणि वाईट कोलेस्ट्रॉलचं प्रमाण घटतं. त्यामुळे बदामाचं साल काढू नये. सफरचंदाच्या सालात फ्लेवनॉइड्स सारखं अँटीऑक्सिडंट असतं. त्याचप्रमाणे पोटॅशियम आणि फायबरची पर्याप्त मात्रा असते. अननसाच्या सालात ब्रोमीलेन नावाचा घटक असतो. यामुळे पोट तथा आतड्याच्या वरच्या आवरणाची सुरक्षा होते. कोबीच्या वरच्या पानांमध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, फायबर, प्रोटीन्स आणि अँटीऑक्सिडंटची पर्याप्त मात्रा असते. बटाट्याच्या सालीत फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, फॉस्फरस तथा व्हिटॅमिन सी आढळतं. टोमॅटोच्या सालीत लायकोपीन नावाचं अँटीऑक्सिडंट असतं. ज्यामध्ये कॅन्सर तथा सूज रोखणारे गुणतत्त्व असतात. लसणाच्या सालीत हृदयाला बळकटी देणारे, वृद्धत्वाची लक्षणं कमी करणारे घटक असतात.