टिटवाळा

index         टिटवाळा हे ठाणे जिल्ह्यातील गणपतीचे जागृत देवस्थान. इथल्या गणपतीला ‘महागणपती’ असे नाव असून मंदिर काळूनदीच्या काठावर वसलेले आहे. मराठा आणि पोर्तुगीज फौजांत वसईत झालेल्या तुंबळ युद्धात चिमाजीअप्पांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी विजय मिळविल्यानंतर चिमाजीअप्पांनी  हे मंदिर बांधले. येथेच कण्वऋषींचा आश्रम होता. शकुंतलेने ह्याच महागणपतीची पूजा केली अशी मान्यता आहे. म्हणूनच ह्या गणपतीला ‘विवाहविनायक’ असेही म्हटले झाटे. इथल्या विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात थेट पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील भजन ऐकू येते अशी अशीही काहींची श्रद्धा आहे.
इथे भेट देणाऱ्या पर्यटकांकरिता पर्यटक निवासाची व्यवस्था असून काही खाजगी हॉटेलही आहेत. कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील टिटवाळा हे तिसरेच रेल्वस्थानक. स्टेशनपासून मंदिर तीन किलोमीटर अंतरावर आहे. मुंबईपासून ६५ किमी अंतरावर हे देवस्थान आहे.

2 Comments