टुरिस्ट गाईड

tourist guideदरवर्षी देशाच्या विविध प्रांतांतून कोट्यवधी भारतीय आणि परदेशांतून सुमारे ५0 लाख पर्यटक भारत सफरीवर येत असतात. त्यापैकी दीड कोटी पर्यटक हे अजिंठा, वेरूळ व मुंबईला भेट देतात. परदेशी पर्यटकांपैकी तीन ते साडेतीन लाख पर्यटक राज्याच्या इतर भागांना जसे पंढरपूर, शिर्डी, पैठण, शनी शिंगणापूर आदी ठिकाणी भेटी देतात. हे पर्यटक मुख्यत्वे ऐतिहासिक स्थळे पाहण्यासाठी आणि व्यावसायिक कारणाने महाराष्ट्रातील शहरांना भेटी देतात. देशांतर्गत आणि राज्यांतर्गत पर्यटनामध्ये धार्मिक कारणाने होणार्‍या पर्यटनाचे प्रमाण सर्वात जास्त आहे.

आपले छंद, आपली आवड जपत जपतच आपण या क्षेत्रात करिअर घडवताना बारावीनंतरच्या अभ्यासक्रमात हे विषय निवडायचे असतात. यासाठी स्वतंत्र अभ्यासक्रमही आहे. ट्रॅव्हल अँण्ड टुरिझम मॅनेजमेंट, करिअर इन ट्रॅव्हल, टुरिझम अँण्ड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट आदीचा अभ्यासक्रम बारावीनंतर पूर्ण करण्यास उपलब्ध आहे. वेगवेगवेळ्या टुरिझम संस्थांचा आणि शासनमान्य अभ्यासक्रम पूर्ण होताच आपण स्वत:चा व्यवसाय उभारू शकता अथवा महाराष्ट्र टूर्स अँण्ड डेव्हलपमेंटसारख्या नामांकित सहली आयोजित करणार्‍या शासनमान्य संस्थेत काम करू शकता. काम करण्यास केसरी टूर्स, सचिन ट्रॅव्हल्स आदी कंपन्यांना अशा तरुणांची आवश्यकता असते. जेवण, राहण्याच्या व्यवस्थेसह सर्व सुख-सुविधा अशा कंपन्या आपल्याला पुरवण्यास तयार असतात.
प्रत्येक प्रांतात वेगवेगळी भाषा बोलली जाते. अशावेळी टुरिस्ट गाईडची आवश्यकता असते. त्या त्या प्रांताची, पर्यटनस्थळाची वैशिष्ट्ये, त्या पर्यटनस्थळाची ऐतिहासिक, सांस्कृतिक, भौगोलिक, सामाजिक माहिती हे गाईड अगदी अचूकपणे सांगत असतात. वैशिष्ट्यपूर्ण कोर्स पूर्ण केल्यानेच हे ज्ञान आत्मसात होत असते.तेव्हा जग जिंकण्याबरोबरच आपण आपल्या आवडत्या क्षेत्रात उत्तम करिअर नक्कीच घडवू शकता. या क्षेत्रात आपण प्रमाणापेक्षा जास्त कमवू शकतो. फक्त आपल्या जिभेवर साखर असावी लागते.तसेच ‘मेक इन इंडिया’ या व्हिजन मध्ये ट्रॅव्हल अँण्ड टुरिझम याला पण महत्व देण्यात आले आहे .