टोमाटोची झटपट भाजी
|साहित्य :-
१) मोठे लालभडक टोमाटो तीन-चार
२) कांदे दोन मध्यम आकाराचे
३) तीन-चार हिरव्या मिरच्या
४) पाव वाटी कोथिंबीर
५) तीन चमचे तेल
६) तिखट एक चमचा
७) चवीपुरतं मीठ वं साखर
८) फोडणीचं साहित्य .
कृती :-
१) टोमाटो , कांदे चिरून घ्यावेत . मिरच्यांचे बारीक तुकडे करावेत . कोथिंबीर चिरून घ्यावी .
२) फोडणी करून (इथं मोहरीऐवजी मेथी वापरल्यास खमंग लागते .) त्यात कांदा परतावा .
३) कांदा गुलाबी झाल्यावर टोमाटोच्या फोडी , मिरच्या व कोथिंबीर घालावी . मीठ , तिखट , साखर घालून तीन-चार मिनिटं शिजवावी .
४) ही भाजी ब्रेडवर पसरून खायला चांगली लागते . मधल्या वेळच्या खाण्यासाठीही चांगली आहे .
५) घाईच्या वेळेत ही भाजी पटकन होते . पांढऱ्या शुभ्र भाताच्या मुदीवर ही भाजी वाढल्यास पानाची शोभा वाढवते .
६) हल्ली मिळतो तो कांदा-लसूण मसालाही यात टाकल्यास छान लागतो .