टोमाटो सॉस (भाज्या घालून)

साहित्य :-TomatoSoup_DT

१)      एक किलो टोमाटो

२)     एक लहान कांदा

३)     दोन-तीन लसूण पाकळ्या

४)     प्रत्येकी एक चिमुट लवंग-दालचिनी पूड

५)    अर्धा चमचा जिरं पूड

६)      अर्धा चमचा धने पूड

७)    दहा-बारा सुक्या लाल मिरच्या (बेगडी)

८)     अर्धी वाटी साखर

९)      पाव वाटी व्हिनेगर

१०)  मक्याचे आणि मटारचे ओले दाणे

११)   अर्धी वाटी फ्लॉवर

१२)  गाजर आणि फरसबीचे बारीक केलेले तुकडे – प्रत्येकी एक मोठा चमचा

१३)  चवीनुसार मीठ . 

कृती :-

१)      व्हिनेगरमध्ये लाल मिरच्यांचे तुकडे भिजत घालावेत .  तासाभरानंतर मिक्सरमध्ये वाटून घ्यावे . 

२)     भाज्यांचे तुकडे , मक्याचे आणि मटारचे ओले दाणे आणि हे वाटण एकत्र करून दोन-तीन तास ठेवावं .   

३)     टोमाटोच्या फोडी , कांदा , लसूण शिजवून घ्यावा .  शिजलेल्या फोडी मिक्सरमध्ये घालून एकजीव कराव्या . 

४)     हा गर प्लास्टिकच्या गाळणीतून गाळून घ्यावा .  उकळत ठेवावा .  उकळत असताना त्यात साखर घालावी . 

५)    मिश्रण घट्ट होत आलं की त्यात मसाले आणि भाज्या घालून एक-दोन उकळ्या देऊन सॉस खाली उतरवावा .  हा सॉस फ्रीजमध्ये ठेवावा .