डाएट करतात घ्या काळजी .

dietसौंदर्यवर्धनाचे उपाय योजताना आरोग्य आणि व्यायामाबाबतीत काळजी घेतली पाहिजे हे खरं; पण डाएट आणि व्यायाम याबाबतीतला अतिरेक काही वेळा ताणास कारणीभूत ठरतो. त्यामुळे सौंदर्यवर्धनासाठी या गोष्टींचा किती पिच्छा पुरवावा याकडेही लक्ष द्यायला हवे. आहाराबाबत अधिक सजग राहून सडपातळ राहण्यासाठी कमी आहार घेण्याचा प्रघात ठेवला तर काही दिवसांनंतर आपले शरीर कुपोषित दिसू लागते. वरकरणी तब्येत उतरलेली दिसली तरी तो अशक्तपणा असतो. शरीराला आवश्यक त्या प्रमाणात पोषक तत्त्वांचा खुराक न मिळाल्यास प्रतिकारशक्ती कमी होण्याचा धोकाही नाकारता येत नाही. त्यामुळे चेहरा काळवंडणे, सतत बेचैनी भासणे, डोळ्याखाली काळी वर्तुळे येणे आदी समस्या उद्भवू शकतात. व्यायामाच्या अतिरेकानेही शरीराचे नुकसान होऊ शकते. म्हणूनच व्यायाम ठरवताना शरीराची धाटणी, वय, क्षमता, शारीरिक कसरतीच्या वेळी येणारा ताण सहन करण्यासाठी असणारी कुवत या सर्वांचा विचार केला जातो. आंधळेपणाने व्यायाम करणे टाळायला हवे. यामुळे नुकसान होऊ शकते.कुठलाही अतिरेक धोक्याचाच