डाळमेथी

dal methi

साहित्य :-

१)      तुरीची डाळ एक वाटी

२)     मेथी लहान अर्धी वाटी

३)     चिंच , गुळ

४)     सुकं खोबरं , धने

५)    जिरे प्रत्येकी एक चमचा

६)      तिखट , मीठ

७)    लसणाच्या पाकळ्या पाच-सहा

८)     फोडणीचं साहित्य .

कृती :-

१)      तुरीची डाळ व मेथी भिजत घाला .  दोन तासांनी तुरीची डाळ व मेथी धुवून घ्या आणि त्यात दोन वाटया पाणी घाला .

२)     कुकरमध्ये शिजवून घ्या .  नंतर घोटून त्यात चिंचेचं पाणी , तिखट , मीठ घाला.

३)     सुकं खोबरं , धने , जिरे भाजून वाटा .  लसणाच्या पाकळ्या वेगळ्या वाटा .

४)     थोडी जास्त तेलाची फोडणी करून त्यात लसूण टाका . 

५)    नंतर घोटलेली डाळ , वाटलेलं जिरं-खोबरं सर्व फोडणीला टाका व कढ आणा .

६)      ही डाळमेथी पळीवाढी चांगली लागते .

One Comment