डाळ वांगं

daal vanga

(डाळ वांगं हा वरणाचा प्रकार काही ठिकाणी मानतात .  पण विदर्भात काही ठिकाणी हा भाजीचा प्रकार मानतात व ते करण्याची पद्धतही काहीशी वेगळी आहे .)

साहित्य :-

१)      छोटी वांगी पाव किलो

२)     तूर डाळ एक वाटी

३)     टोमाटो एक , सुक्या लाल मिरच्या चार-पाच ,

४)     गरम मसाला दोन चमचे

५)    कोथिबीर , तेल पाव वाटी

६)      फोडणीचं साहित्य , मीठ .

कृती :-

१)      वांगी धुवून मसाला वांगी करतो त्याप्रमाणे देठासकट ठेवून त्याच्या गोलाकार   भागावर + असा छेद घ्यावा .

२)     तुरीची डाळ अर्धा तास आधी भिजवून ठेवावी व निथळून घ्यावी .  भांड्यात तेल गरम करून मेथीची फोडणी करावी .

३)     त्यात तुरीची डाळ घालावी .  डाळ चांगली परतल्यावर त्यात गरम मसाला व टोमाटोच्या बारीक फोडी घालाव्यात .  चवीपुरतं मीठ घालावं .

४)     तुरीची डाळ अर्धवट शिजल्यावर त्यात वांगी घालावी .  डाळ अशा पद्धतीनं शिजू द्यावी की डाळीचा दाणा सुटा राहील आणि वरण घट्टसर होणार नाही .

५)    डाळींब्या वरण म्हणतात त्याप्रमाणे डाळ असली पाहिजे .  वांगी डाळीच्या स्वादानं वाफेवर शिजतात .

६)      डाळ वांगं शिजल्यावर ते वाढण्याआधी त्यावर सुक्या लाल मिरच्यांचा तडका घालावा व कोथिंबीर पेरावी .

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *