डुबकवणी

kairi

साहित्य :-

१)      अर्धवट पिकलेल्या कैऱ्या तीन-चार

२)     हिरव्या मिरच्या चार

३)     मोहरीची डाळ तीन-चार चमचे

४)     साखर किंवा गुळ दोन चमचे

५)    चवीला मीठ

६)      तेल पाव वाटी

७)    फोडणीचं साहित्य .

कृती :-

१)      कैऱ्या आधी उकडून घ्या .  नंतर त्याची सालं काढून टाका .  मोहरीची डाळ चार वाट्या पाण्यात चांगली फेसून घ्या .

२)     त्या फेसलेल्या पाण्यात मीठ , कैऱ्या कुस्करून त्यांचा गर व गुळ घाला .  नंतर हे पाणी पातेल्यात उकळण्यासाठी ठेवावं .

३)     पाणी उकळत असतानाच छोटया फोडणीच्या कढाईत मोहरी , हिंग , हळद व मिरच्या घालून ती फोडणी त्या उकळणाऱ्या रश्श्यावर घाला .  झाली डुबकवणी तय्यार .

४)     आंध्रात जसं सांबार-भात खातात तसे जुनी वऱ्हाडी लोक डुबकवाणी भात खात असत .