डेंग्यू-मलेरिया टाळण्यासाठी

antimosquitoडेंग्यू-मलेरिया हे आजार विशिष्ट प्रकारच्या डासांमुळे उद्भवतात. आजकाल डास सर्वत्रच आढळतात. त्यापासून बचावासाठी आपण वेगवेगळ्या अगरबत्ती, डास मारणारी उपकरणेही वापरतो. मात्र तरीही डासांपासून पूर्णपणे सरंक्षण होतेच असे नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या डासांची उत्पत्तीच होणार नाही अथवा त्यांचा फैलाव कसा रोखला जाईल याकरीता पुढे दिलेले काही उपाय आम्ही सुचवीत आहोत, जे तुम्हाला डासांपासून आणि पर्यायाने डेंग्यू-मलेरिया सारख्या भीषण आजारांपासून दूर ठेवण्यास निश्चितच फायदेशीर ठरतील!

१)        आठवड्यातून एक दिवस पाण्याचा साठा असलेली सर्व भांडी रिकामी करून घासून-पुसून कोरडी करा.

२)      इमारतीवरील पाण्याच्या टाक्यांना झाकणे लावा. घरातील सर्व पाणीसाठे झाकून ठेवा.

३)      घराच्या परिसरातील अडगळीचे साहित्य नष्ट करून परिसर स्वच्छ ठेवा.

४)      डासांपासून संरक्षणासाठी घराच्या खिडक्यांना जाळ्या बसवा. झोपताना मच्छरदाणीचा वापर करा.

५)      ताप येताच वैद्यकीय सल्ला घ्या. तापात अँस्पिरीन किंवा ब्रुफेन अशी औषधे घेणे टाळा, ती धोकादायक ठरू शकतात.

६)       डेंग्यू, मलेरिया तापाची लक्षणे आढळल्यास त्वरित नजीकच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.