डॉ. बाबासाहेब आंबेडकर

bab

आभाळान नाकारलेल्या पंखांना उडण्याच सामर्थ्य देऊन,गगन भरारीच वेड लावून, आज्ञान आणी दारिद्र्यात खितपत पडलेल्या दलीत बहुजनांना माणूस म्हणून ओळख निर्माण करून देणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांची आज १२३ वी . पुण्यतिथी आज देशभरात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे.

भीम भक्तांची गर्दी अलोट पाहायला मिळते,कारण हा उत्सव असतो सन्मानाचा,हा उत्सव असतो अस्मितेचा,हा उत्सव असतो लोकशाहीचा,हा उत्सव असतो मानवीय स्वातंत्र्याचा,हा उत्सव असतो हुशारीचा,कर्तबगारीचा. हा उत्सव असतो नवचैतन्याचा.
बाबासाहीबांनी केलेल्या त्यागाची जाणीव चिरंतन राहावी ह्यासाठी सबंध भारतात चैतन्याचं वातावरण असत.
डॉ. आंबेडकरांचा जन्म एप्रिल १४ इ.स. १८९१ साली महू या मध्यप्रदेशातील लष्करी छावणी असलेल्या गावात त्याकाळी अस्पृश्य गणल्या गेलेल्या महार कुटुंबात झाला. सुभेदार रामजी सकपाळ आणि भीमाबाई मुरबाडकर यांचे ते १४वे अपत्य होते.
हे कुटुंब मूळचे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील आंबवडे या गावचे. त्यांचे पूर्वज ब्रिटिश सैन्यात नोकरी करत होते. त्यांच्या वडिलांना मराठी व इंग्रजी भाषांमध्ये थोडे शिक्षण मिळाले होते व त्यांनी आपल्या मुलांना शिकण्याची प्रेरणा दिली.
इ.स. १८९६ मध्ये भीमरावांच्या आईचे-भीमाबाईंचे मस्तकशूळ या आजाराने निधन झाले. त्यावेळी मातृविहीन भीमरावांचा ममतायुक्त आधार बनण्याचे मोठे काम आत्या मीराबाईंनी केले.
डॉ. बाबासाहेब तथा बी.आर.आंबेडकर यांनी मुंबई येथील एलफिन्स्टन कॉलेजमध्ये बी.ए. पर्यंतचे शिक्षण घेतले.
नोव्हेंबर १९१२ मध्ये मुंबई विद्यापीठाची बी.ए.ची परीक्षा दिली.
डॉ.आंबेडकरांचे चरित्र ही एक शूर समाजसुधारकथा वीरकथा आहे, शोककथा आहे. गरीबांनी, दीनांनी आणि दलितांनी ही रोमहर्षक कथा वाचून स्फूर्ती घ्यावी आणि आंबेडकरांचा त्यांनी जन्मभर छळ केला आणि उपहास केला त्या प्रतिगामी राज्यकर्त्यानी आणि सनातनी हिंदूनी त्यांची ही शोककथा वाचून आता पश्चात्तापाने अवनतमस्तक व्हावे. आंबेडकरांच्या जीवनावर आणि कार्यावर जसा जसा अधिक प्रकाश पडेल तसे तसे त्यांचे अलौकिकत्व प्रकट होईल आणि मग आंबेडकर हे हिंदू समाजाचे शत्रू नसून उद्‌धारकर्तेच होते अशी भारताची खात्री पटेल
3 Comments