ढेमश्याची भरून भाजी

Tinde Ki Sabji copy

साहित्य :-

 

१)      पाव किलो छोटे ढेमसे (याला मराठवाड्यात दिलपसंद म्हणतात)

 

२)     खसखस दोन चमचे

 

३)     तील तिने चमचे

 

४)     सुक्या खोबऱ्याचा कीस पाव वाटी (छोटी)

 

५)    मध्यम आकाराचे कांदे दोन-तीन

 

६)      गरम मसाला दोन चमचे

 

७)    तेल अर्धी वाटी , हळद , तिखट , लसूण पाकळ्या पाच-सहा

 

(गरम मसाल्याऐवजी धन्या-जीऱ्याची पूड एक-एक चमचा , आणि कोथिंबीर थोडीशी बारीक चिरून घालता येते .)

 

कृती :-

 

१)      प्रथम ढेमसे धुवून त्याच्या देठाकडील भागावर छोटासा गोल छेद देवून आतल्या बिया आणि गर काढून टाकावा .

 

२)     कांदा बारीक चिरून तो तेलावर गुलाबीसर परतून घ्यावा .  खसखस , तीळ खोबरं  वेगवेळ भाजावं .  एकत्र वाटावं .

 

३)     वाटतांना त्यात धने , जिरं , लसूण तसंच परतलेला कांदा घालावा . 

 

४)     हे सारण तयार झाल्यावर त्यात हळद , तिखट , (धने-जिरं न घातल्यास गरम मसाला) मीठ चवीपुरत घालावं .

 

५)    हे सारण प्रत्येक ढेमशात भरावं .  त्यानंतर पसरट भांड्यात किंवा प्रेशरपैनमध्ये अर्धी वाटी तेल घालावं . 

 

६)      तेल गरम झाल्यावर मोहरी , हिंग , हळद घालून फोडणी करावी आणि पैन अथवा भांड्यात एक-एक ढेमसं , त्याचं तोंड वरच्या दिशेला असेल असं ठेवावं .  त्यात पाणी आजिबात घालू नये .

 

७)    प्रेशर पैनमध्ये मंद आचेवर पाच-सहा मिनिटात भाजी शिजते .  त्यापेक्षा जास्त वेळ ठेवल्यास भाजी खूपच लगदा होते .

 

८)     साध्या भांड्यात जिव्हा भाजी करायची असेल तेव्हा भांड्यात वरीलप्रमाणेच ढेमसे ठेवून त्यावर झाकण ठेवून त्यावर पाणी घालावं . 

 

९)      म्हणजे भाजी शिजण्यास मदत होते .  भाजीत पाणी घालू नये , तसचं भाजी हलवू नये .

 

१०)  वीस-पंचवीस मिनिटांनी भाजी उतरवून भांड्यात काढताना ढेमसं अलगद काढावीत म्हणजे मसाला बाहेर येणार नाही .  वरून कोथिंबीर घालावी .

 

१)       

२)     वीस-पंचवीस मिनिटांनी भाजी उतरवून भांड्यात काढताना ढेमसं अलगद काढावीत म्हणजे मसाला बाहेर येणार नाही .  वरून कोथिंबीर घालावी .

2 Comments