तणाव हाताळायला शिका

in tensionटीव्हीवरची एक जाहिरात समस्त नोकरदारांचे प्रतिनिधित्व करणारी आहे. या जाहिरातीतील व्यक्ती आठवडाभर ‘संडे कब है’ म्हणत, पाय ओढत कामाला जात असतो. बहुसंख्य नोकरदारांची अशीच गत असते असे म्हणायला हरकत नाही. कामाचा ताण, डेडलाईन पाळण्याच्या कसरती, वरिष्ठांच्या वाढत्या अपेक्षा, सहकार्‍यांबरोबर जमवून घेताना उडणारी धांदल, ऑफिस गॉसिप्स, स्पर्धा या सर्वांचा परिपाक म्हणून कामाचा उबग येणे स्वाभाविक आहे. मात्र काही उपाय योजल्यास ऑफिसमध्ये कामाचा ताणही सहज पेलला जाऊ शकतो. यासाठी गरज आहे ती कौटुंबिक आयुष्यातील तणाव कमी करून मजेत आयुष्य जगण्याची. घर आणि ऑफिस या दोन गोष्टी वेगळ्या ठेवायला हव्यात. घरातल्या व्यथा आणि कटकटी ऑफिसमध्ये आणू नयेत. त्याचप्रमाणे ऑफिसमधली प्रेशर्स घरी नेऊ नयेत. काम करताना दर दोन तासांनी पाच-दहा मिनिटांची विश्रांती घ्यावी. सहकार्‍यांशी गप्पा गोष्टी कराव्या, चार चांगल्या गोष्टी शेअर कराव्यात. दिवसाची सुरुवात प्रसन्न असल्यास संपूर्ण दिवस चांगला जातो हे लक्षात ठेवा. व्यायाम, मोकळ्या हवेत फिरणे, संगीत ऐकणे, चांगली पुस्तके वाचणे, मित्रमंडळीत रमणे यामुळे मनोवृत्ती सुधारून कामही चांगले होते.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *