तरीही माझा भारत देश महान आहे

mera-bharat-mahanश्रीमंतीची वाढती राजवट

भ्रष्टाचार कोण्याकोण्यात आहे

गरिबी मात्र न्यायावीन अनवान आहे

तरीही माझा भारत देश महान आहे

 

जाती धर्माच आंधळ प्रेम

आपापसातच दंगली आपर आहेत

त्यातच दंगलखोर मित्र पाकिस्तान आहे

तरीही माझा भारत देश महान आहे .

 

सुवर्ण आमचा इतिहास

परीक्षम,सदाचाराची तिजोरी

परंतु त्यावरही आमच रान विराण आहे

तरीही माझा भारत देश महान आहे .

 

काय आमचा शिवबा

अन काय आमचे फुले,बाबासाहेब

आज मात्र मनामनात देपिका शाहरुख खान आहे .

तरीही माझा भारत देश महान आहे .

 

भारताचे सदुध नागरिक आम्ही

प्रगतीकडे आमची वाटचाल आहे

मात्र आमचा बळीराजा कोरडा प्राण आहे

तरीही माझा भारत देश महान आहे .