तळपायाचे सौंदर्य वाढविण्यासाठी……

  talpay   ‘आपके सुंदर पैर जमीन पे मत रखीये, मैले हो जायेंगे’ नायिकेच्या सुंदर पायांना उद्देशून नायकाने ‘पाकिजा चित्रपटात वापरलेल्या ह्या ओळींप्रमाणे आपलेही तळपाय सुंदर दिसावेत याकरीता उपाय खालीलप्रमाणे,

१)        सौंदर्याच्या दृष्टीने पायांचेही महत्व आहे. शरिरातीलकॅल्शिअम आणि स्निग्धतेच्या कमतरतेमुळे तळपायांना भेगा पडतात.तळपायांना भेगा न होण्यासाठी शक्यतो कडक, उंचटाचेच्या चपलांचा वापर करून ये. नरम चप्पल किंवाकापडी बूटाचा वापर करावा.

२)      पायांचा जर सतत धूळ आणि मातीशी संपर्क येत असेल तरपाय तीन ते चार वेळ स्वच्छ धुवून पायात मोजे घालावेत.

३)      दीड चमचा व्हॅसलिन व एक लहान चमचा बोरीक पावडरयांचे मिश्रण करून तळपायांवरील भेगांवर लावल्यास  फुटलेल्या टाचा भरू लागतील.

४)      टाचांना भेगा पडून रक्त येत असेल तर लोणी आणि हळदएकत्र करून त्याने तळपायांना मसाज करावा.
कोरफडच्या वापरानेही भेगा बर्‍या होतात.