तवा सब्जी

साहित्य :-tawa sbzi

१)      बटाटे उकडून त्याचे उभे लांबट जरा पातळ काप करावेत

२)     ढोबळी मिरची , वांगी

३)     कारलं , भेंडी

४)     परवर , फ्लॉवर यासारख्या भाज्या असतील तर त्या उभट , लांबट कापून त्याचे तुकडे करावे , वरच्या भाज्यांच्या प्रमाणात कांदा एकदम बारीक कापलेला

५)    टोमाटो दोन-तीन किसलेले

६)      आलं-लसूण पेस्ट

७)    कांदेही उभे चिरून तुकडे

८)     पावभाजीचा चाट किंवा गरम मसाला

९)      हिरवी मिरची पेस्ट तेल (जरा जास्त)

१०)  पनीर असल्यास , चवीपुरतं मीठ .

कृती :-

१)      प्रत्येकी भाजी तळून घेऊन बाजूला ठेवावी .  उरलेल्या तेलात आधी कांद्याचे तुकडे तळून घ्यावेत . 

२)     पनीरही तळून घ्यावं .  बाजूला ठेवावं .  चिरलेला कांदा एकदम लाल परतून त्यात किसलेले टोमाटो , आलं-लसूण पेस्ट घालावी . 

३)     हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून मीठ टाकावं .  व्यवस्थित हलवावं . 

४)     घरात असलेल्या सर्वात मोठया तव्यावर मध्यभागी थोडं तेल टाकून त्यावर हवा असलेला मसाला टाकावा . 

५)    तव्यावर बाजूनं सगळ्या तळलेल्या भाज्या वेगवेळ्या ओळीनं लावाव्यात . 

६)      पानात वाढतेवेळी गैस मोठा ठेवून हवी अस्लेली भाजी मसाल्यात व      असलेल्या तेलात बुडवून किंचित तळून गरमगरम वाढावी .  वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी .   

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *