तांदळाची धिरडी
|१) एक वाटी तांदळाचं पीठ
२) एक वाटी दुध
३) पाव वाटी पाणी
४) एक चमचा साखर
५) पाव चमचा जिरं
६) थोडं तेल
७) चवीनुसार मीठ .
कृती :-
१) धिरडं करण्यासाठी बीडचा किंवा जाड लोखंडाचा तवा तापत ठेवावा . तेल सोडून इतर गोष्टी एकजीव करून घ्याव्या .
२) तवा तापला की नारळाची शेंडी किंवा चिंधीनं तव्याला तेल लावून घ्यावं .
३) एक चमचाभर पीठ घालून पीठ तव्यावर पसरून किंचित तेल सोडून झाकण ठेवावं . चर्र आवाज आला की धिरडं उलटावं .
४) नीट उलटलं गेलं आणि जरा जाड वाटलं तर थोडं पाणी घाला . एकदा जमलं की तवाभर धिरडं करता येतं .