तारुण्य पिटिकांपासून मुक्ती मिळविण्यासाठी.
|किशोरवयात आल्यानंतर तारुण्यपिटीकांचा त्रास बऱ्याच जणांना सतावतो. बरेच जण यावर घरगुती उपाय करतात. प्रसंगी डॉक्टरचाही सल्ला घेतात. तारुण्यपिटीकांपासून मुक्ती मिळविण्यासाठी काही फायदेशीर उपाय खालीलप्रमाणे….
१) चंदन पावडर, कच्चे दूध, तुळशीची काही पाने याचा लेप बनवून चेहर्यावर दहा मिनिटे लावल्यास तारुण पिटीका दूर होण्यास मदत होते.
२) कडुलिंबाची पाने, कोरफडीचा गर, अंबेहळद पावडर याचा लेप बनवून चेहर्यावर वाळू द्यावा. त्याचा फायदा होईल.
३) लिंबाचा रस, दही, मुलतानी माती याचे मिश्रण करून चेहर्यावर लावावे. पाच मिनिटांनी ओलसर बोटांनी चोळून लेप काढावा. तारुण्य पिटीका गायब होतात.
४) संत्र्याच्या सालीची पावडर, कच्चे दूध, काकडीचा रस या मिश्रणाचा चेहर्यावर लेप लावल्यास तारुण्य पिटीका होत नाहीत. पुदिन्याच्या पानांचा रस रोज रात्री चेहर्यावर लावावा.
५) पुटकुळ्या नाहीशा होऊन चेहर्यावरील कोरडेपणा जातो.त्वचेला कांती येण्यासाठी संत्र्याचा रस अत्यंत उपयुक्त आहे.
६) बदाम आणि गुलाबाच्या कळ्या एकत्र वाटून ते सौम्य क्रिमबरोबर चेहर्यावर लावल्याने सौंदर्य वाढते.
chan chan chan farcha chan