तालिबानला आता ‘सचिनद्वेष’

indexजागतिक क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती पत्करलेल्या भारताचा महान फलंदाज सचिन तेंडूलकर याच्यावर क्रिकेट खेळणाऱ्या अथवा लोकप्रिय असणाऱ्या सगळ्याच देशांच्या माध्यमांमधून कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यातच दक्षिण आशियामध्ये क्रिकेट हा सर्वात लोकप्रिय खेळ. पाकिस्तानही यास अपवाद नाही. तिथल्या माध्यमांनीही सचिनच्या निवूत्तीची दखल घेत त्याला उचित स्थान दिले. त्याच्या पदार्पणापासून तर कारगीर्द, विक्रम, फलंदाजीचे विविध किस्से याचे दिलखुलास वर्णन रोजच तिथल्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध होते. नेमकी हीच बाब तालिबानला खुपली. तालिबानचा भारतद्वेष तर सर्वश्रुतच आहे. म्हणून सचिन जागतिक कीर्तीचा महान फलंदाज असला तरी तो भारतीय आहे याची तिथल्या माध्यमांना आठवण करून देत सचिनचे कौतुक करणे नाही थांबविले तर महागात पडण्याचीही धमकी देऊन टाकली.

‘क्रिकेट हा केवळ खेळ असून झाले गेले सारे विसरून आनंदात क्रिकेट खेळू’ अशी भूमिका घेणाऱ्या भारतीय सत्ताधाऱ्यांनी यापासून काहीतरी बोध घ्यायला हवा.