तालिबानी आतंक……

fft64_mf1427122
सापाला कितीही दुध पाजलं तरी तो डसल्याशिवाय रहात नाही,याचा प्रत्येय काल पाकिस्तानी सरकारला आला.
ज्या दहशतवादाला पाकिस्तान खतपाणी घालत होत तोच दहशतवाद पाकला आता जेरीस आणतोय.
काल पाकिस्तानात पेशावर मध्ये एका मिलेटरी शाळेवर भ्याड हल्ला केला ज्यामध्ये शाळेत असलेले १३२ विद्यार्थी आणि इतर १४१ व्यक्तींची गोळ्या घालून निर्घुण हत्या करण्यात आली.
अतिशय कोवळ्या अंगांवरती ह्या सैतानांनी गोळ्या डागल्या.ह्या भ्याड हल्ल्याची जगभरातून निंदा होत आहे.
आतंकवाद्यांना कुठ्लाच धर्म नसतो वा प्रांतही नसतो हे कालच्या ह्या हल्ल्यातून स्पष्ट झालं आहे.
मात्र पाक सरकार यातून काही धडा घेतो कि नाही हे तर येणारा काळचं ठरवणार…..
मात्र माणुसकीला काळिमा फासणारी हि घटना होती.