तिखट आणि गुणकारी मिरची

mirchiकुठल्याही तिखट पदार्थाला झणझणीत स्वाद देण्यासाठी मिरचीचा वापर होतो. ही स्वयंपाकघरातील अत्यावश्यक गोष्ट आहे. तिखट-मिठाशिवाय स्वयंपाक स्वादिष्ट होऊ शकत नाही. मिरच्या तिखट, चविष्ट आणि रूचकर असल्या तरी अतिरेकी सेवन घातक ठरते. मिरचीच्या अतिरिक्त सेवनामुळे तमोगुण वाढतो. त्वचारोग संभवतो, शरीरातील उष्णता वाढते. जठर नरम पडते. डोळ्यांचे नुकसान संभवते. मूळव्याध अथवा लघवीची जळजळ हादेखील त्रास संभवतो. म्हणूनच मिरचीचा आहारातील उपयोग र्मयादित असावा. कॉलरा निवारण करण्यासाठी मिरचीच्या गोळ्या वापरतात. यासाठी समप्रमाणात मिरच्या, कापूर आणि हिंग हे पदार्थ एकत्र दळून वाटाण्याएवढय़ा गोळ्या करतात. पाण्याबरोबर तासातासाला एक गोळी घेतल्यास कॉलराचा धोका कमी होतो. मिरचीमुळे ताप कमी होतो, त्याचप्रमाणे रक्त शुद्ध होते. मिरचीचा अल्प वापर पचनक्रिया उत्तम राहण्यास मदतगार ठरतो. मिरचीमुळे नत्रयुक्त पदार्थांचे योग्यप्रमाणे परिवर्तन होऊन पौष्टिक तत्त्वांचा संग्रह होतो. त्यामुळे शरीराचे कार्य सुरळीत होते. मात्र मिरचीच्या तिखटपणामुळे किडनीलाही इजा पोहचू शकते. यामुळे आतड्याचे विकार संभवतात.