तुका आकाशा एवढा

वेदाचा अर्थ तो आम्हासी ठावा,इतरांनी व्हावा भार माथा.

अशी परखड अभंग रचना करून अखंड महाराष्ट्राचे कवच कुंडल ठरलेले संतसूर्य तुकाराम महाराज.
tukaram_maharajदेवळापेक्षा भक्ती आणि धर्मापेक्षा माणुसकी श्रेष्ठ आहे अस सांगत. आयुष्भर माणूसपण जपणारं एकमेव व्यक्तिमत्व म्हणून तुकोबांची वेगळी ओळख आहे. प्रापंचिक व्युहात न अडकता जन्मभर दांभिकतेवर चौफेर फटकेबाजी करत वैष्णवांचा खरा धर्म आपल्या अभंगातुनी तुकोबांनी पटवून सांगितला. ती संपत्ती काय कामाची जी आपत्तीत कामात येत नाही. ह्या विचाराने लोकांची कर्जखाती पाण्यात बुडवून लोकांना कर्जमुक्त आणि भयमुक्त करण्याच काम तुकोबांनी केलं. आजही त्यांच्या एका एका अभंगावर p.hd चे मोठ-मोठ्ले प्रबंध लिहिले जातात. त्यांच्या सहज सरळ परंतु प्रभावी तसेच परखड स्वभावाला कीर्तनकार मोठ्या खुबीने रंगवतात. त्यांचे अभंग म्हणजे तिमिरातून प्रकाशाकडे जाण्याचा अद्भुत मार्ग,त्याचं चरित्र म्हणजे बर्फाहुनी शीतल,कापसाहून मऊ, छत्रपति शिवाजी महाराजांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारे तुकोबा,आज २१ व्या शतकात देखील आपल्या अभंगातुनी जनमानसांना वेदांचा आणि व्यवहाराचा खरा-खुरा अर्थ सांगून जातात. सर्व-सामन्यांच्या हृदयामध्ये आजही त्यांच्या गाथा तरंगत आहेत म्हणून तुका आकाशा एवढे वाटतात….

3 Comments