तु माझा सांगाती

tumajha
माणुसपण अभंग ठेऊन साक्षात परमेश्वराला लाजवणारा माणूस म्हणजे संतसूर्य तुकाराम महाराज,आयुष्याच चंदन करून त्याचा सुगंध आपल्या अभंगाच्या माध्यमातून जनमानसात वाटणारा माणूस म्हणजे तुकाराम महाराज,
“वेदाचा अर्थ आम्हासी ठावा ,इतरांनी व्हावा भार माथा”.असं सांगून सनातन्यांना ठणकावनारा तत्ववेत्ता म्हणजे तुकाराम महाराज, ज्ञान,तेज,माणुसकी,आपुलकी,निस्वार्थ,भक्ती ह्यामधून तयार झालेलं रसायन म्हणजे तुकाराम महाराज..इंद्रायणीच्या जळाला चंद्रभागेची महती प्राप्त करून देणारा कर्मयोगी म्हणजे तुकाराम महाराज.
बरे झाले देवा कुणबी झालो,अस म्हणून आपल्या जातीचा अभिमान बाळगणारा आणि वर्णवर्चस्ववादी परंपरेला मुठ माती देणारा लडवय्या म्हणजे तुकाराम महाराज.
मुळात “तुकाराम”ह्या नावातच विश्वाचं तत्वज्ञान सामावलेलं आहे.
ती संपत्ती काय कामाची जी आपत्तीत कामाला येत नाही,असं म्हणून आपली वडिलोपार्जित सावकारी,भावाच्या स्वाधीन करून आपल्या वाटेचा हिस्सा लोकांना वाटून देणारा माणूस जगाच्या इतिहासात तुकाराम हा एकमेव होता.आणि ह्या तुकारामाला आपल्या प्रेमाच्या पदराने जपणारी माऊली म्हणजे त्यांची धर्मपत्नी आवली.मात्र इतिहासाने आवलीवर मोठा अन्यायाचं केला आहे.रागीट,भांडखोर,आवदसा,तुकोबांना शिव्या घालणारी,विठ्ठलाला काळतोंड्या म्हणणारी,तुकोबाला मारणारी असं वर्णन आवलीच केलं आहे.मुळात ह्या उपमांच्या उलट आवलीच कार्य होत.तुकोबाच्या अभंग वह्यांची काळजी घेण,पावसापाण्यापासून त्याचं सौरक्षण करण,तुकोबांना डोंगरावर भाकरी पोचवण अशी कितीतरी कामे त्या माउलीची आहेत.तुकोबांच्या गाथा जेव्हा पाण्यात बुडवल्या गेल्या तेव्हा ढसाढसा रडणारी आवलीच होती हे इतिहास सांगत नाही.
अशाच आवली आणि तुकोबांच्या संसाराचं वर्णन करणारी एक नवी मालिका”तु माझा सांगाती” ई टीवी मराठीवर सध्या दररोज संध्याकाळी ७:३० ला प्रसारित होत आहे,या मालिकेत तुकोबांच्या भूमिकेत चिन्मय मांगलेकर आहे.अस्सल तुका-आवालीच्या संसाराची गाथा सांगणारी हि मालिका आहे.