तू गेल्यावर
|तू गेल्यावर…
शब्द माझे तुझ्यासाठी
माझ्यासारखे असे काही झूरतात
माझ्यासारखेच तुझ्यावर
ते जिवापाड मरतात….!!
तू गेल्यावर….
मजा मी एकटा
गप्प बसून राहतो
तू येणार्या क्षणांची
आतूरतेने वाट पाहतो….!!
तू गेल्यावर….
आजही आठवते मला
तुझे-माजे ते सरते दिवस
पौर्णिमेच्या रात्री आभाळ आल्यावर
चांदण्याना वाटते जशी अमावस…..!!
तू गेल्यावर….
आता फक्त मी
शब्दाना चालत राहतो
जुनेच शब्द पुन्हा घेऊन
कविता करत राहतो….!!
तू गेल्यावर…..
आता मज मला
राहत नाही स्मरण
इतका अभागीतुझ्याशिवाय मी
वाट पाहता तुझी येतही नाही मरण….!
