तेलंगणा आता स्वतंत्र

telanganaविविधेतून एकता साधणाऱ्या भारत देशात भाषावार प्रांत रचनेतून माणस विभागली गेली आहेत,त्यातुन भाषावाद जन्माला आला,तो आजही सुरु आहे,आणि आता तेलंगाना नवीन राज्य म्हणुन उदयास आल,मोठ्या संघर्षानंतर त्याला आता मान्यता देखील मिळाली आहे. 
तुकड्या तुकड्यात वाटल्या गेलेल्या भारतात आता प्रांतवादाच आणखीन एक नावं समोर आलं ते तेलंगाना च्या रुपात…। 

अनेक वर्षांच्या संघर्षानंतर वेगळ्या तेलंगण राज्याचा आज अधिकृतरित्या ‘भारताचे 29वे राज्य’ म्हणून जन्म झाला. तेलंगणचे पहिले मुख्यमंत्री म्हणून के. चंद्रशेखर राव यांनी आज सकाळी शपथही घेतली. काल मध्यरात्रीपासूनच तेलंगणमध्ये नव्या राज्यनिर्मितीचा जल्लोष सुरू झाला होता. 

एकत्र आंध्र प्रदेशचे विभाजन करून तेलंगण आणि आंध्र प्रदेश ही दोन वेगळी राज्ये निर्माण करण्याचा ठराव संसदेमध्ये फेब्रुवारीत मंजूर झाला होता. त्यावेळी 2 जून ही दोन्ही राज्यांच्या निर्मितीची अधिकृत तारीख ठरविण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीच्या काळातच 30 एप्रिल रोजी येथे विधानसभेसाठीही मतदान झाले. यात तेलंगणमध्ये के. चंद्रशेखर राव यांच्या ‘टीआरएस’ने अपेक्षेप्रमाणे बहुमत मिळविले. तेलंगण आणि आंध्र प्रदेश या दोन्हींसाठी हैदराबाद हीच संयुक्त राजधानी असेल. पुढील दहा वर्षांत सीमांध्राला वेगळी राजधानी उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 
 आता नवीन राज्याची नवी आणि स्वतंत्र वाटचाल कशी असेल हे तर येणारी वेळेचं ठरवेल…