तोंडल्याची भाजी

साहित्य :-Snappy-Asparagus-Bacon-58080

१)      तोंडली पाव किलो

२)     हिरव्या मिरच्या चार

३)     किसलेलं सुकं खोबरं पाव वाटी

४)     लसूण सात-आठ पाकळ्या

५)    पाव वाटी तेल

६)      फोडणीचं साहित्य

७)    चवीपुरतं मीठ .

कृती :-

१)      तोंडली उभ्या चार भागात चिरावीत .  अर्धी पळी तेलाची फोडणी करावी . 

२)     त्यात हिरवी मिरची व ठेचलेला लसूण घालावा .  नंतर तोंडली घालून परतावीत . 

३)     दीड ते दोन वाटया पाणी घालून भाजी शिजवून घ्यावी .  मग यात खोबरं ,  मीठ व अर्धा चमचा साखर (आवडत असल्यास) घालून मंद आचेवर एक       वाफ आणावी .