थंडीचा प्रतिकार करतांना….

imagesथंडीची चाहूल आता लागायला लागली आहे. हिवाळ्याचे हे दिवस आरोग्याच्या दृष्टीने चांगले मानले जात असले तरीही सर्दी, खोकला, ताप तर काही जुनी दुखाणीही डोके वर काढू शकतात. ह्या सर्व दुखण्या-खुपण्यांचा यशस्वीपणे बंदोबस्त करण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे फार गरजेचे आहे. त्याकरीता आपल्या आहारात खालील पदार्थांचा समावेश करावा,

१)      लसूण:- थंडी पळविण्यासाठी लसूण अत्यंत गुणकारी मनाला जातो. ह्याच्या सेवनाने थंडी लागत नाही. लसूणाच्या सेवनाने संसर्ग होत नाही तसेच विषाणूंचा धोकाही टाळतो.

२)      चिकन सूप:- थंड हवेशी लढण्यासाठी चिकन सूप चांगले मानले जाते. एक वाटी चिकन सूप पिल्याने पोतही भरते आणि सर्दी-खोकल्यापासुनही मुक्ती मिळते.

३)      पालक:- पालकमध्ये खूप मोठ्या प्रमाणात एंटीऑक्‍सीडेंट, विटामिन आणि मिनरल्स असतात जे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवितात.

४)      गजर:- हिवाळ्यात आपल्या आहारात गाजराचा समावेश जरूर करावा. गजराच्या सेवनाने शरीरात निर्माण होणारे विषाणू नाश पावतात.

५)      काळी मिरी:- सर्दी-खोकला आदी आजारांशी लढण्यासाठी आहारात काळ्या मिरीचा समावेश करावा.

६)      अदरक:- सर्दी-खोकल्यापासून आराम मिळण्यासाठी अदरक फार उपयोगी असते. अदरक मिश्रित चहा हिवाळ्यात जरूर प्यावा.

One Comment