थ्री-डी – चित्रपटाचे एक नवे रूप

grafik-940-family-3d-maker-7-intआपण थ्री-डीमध्ये  बघितला असेल , कशी होते थ्री-डी सिनेमांची निर्मिती जाणून घेयुया आजच्या लेख मध्ये.

थ्री-डी सिनेमांची निर्मिती कशी होते?
थ्री-डी अँनिमेशन चित्रपट विविध पातळीवर तयार करण्यात येतो. सर्वप्रथम तुमच्याकडे पटकथा तयार हवी. त्यानंतर त्यामधील भूमिका निर्माण केल्या जातात. त्यानंतर कॅरेक्टर आणि पटकथेच्या अनुषंगाने अँनिमेशन तयार करण्यात येते. याव्यतिरिक्त चित्रपटाशी संबंधित इतर गोष्टी जसे प्रकाश व्यवस्था, स्क्रिप्ट, डायनॅमिक्स, व्हॉईस रेकॉर्डिंग या माध्यमातून चित्रपटाची निर्मिती केली जाते.संगणक प्रणालीवर (सॉफ्टवेअर) आधारित हा अभ्यासक्रम आहे. यामध्ये थ्री-डी स्टुडिओ मॅक्स, माया, सॉफ्ट इमेज यांसारखे आघाडीचे सॉफ्टवेअर्स आहेत. या संगणक प्रणालींच्या मदतीने वास्तववादी प्रतिमा तयार करण्यात येतात. यामध्ये त्रिमिती (एक्स, व्हाय, झेड) असतात. यामध्ये प्रथम मॉडेलिंगद्वारा वस्तू निर्माण केल्या जातात. त्यानंतर अँनिमेशनच्या मदतीने त्यांना चालते-फिरते करण्यात येते. हल्ली कॅरेक्टर अँनिमेशनचा जमाना आहे. यामध्ये वस्तू तयार करून त्यांना गतिमान करण्यात येते. अँनिमेशनमध्ये विविध प्रकारचे तंत्रज्ञान उपयोगात आणले जाते. पारंपरिक अँनिमेशन, स्टॉप मोशन अँनिमेशन, रोटोस्कोपिक अँनिमेशन, कॉम्प्युटर जनरेटेड थ्री-डी अँनिमेशन, क्लॅमेशन हे यामधील प्रकार आहेत. संगणकात थ्री-डी अँनिमेशनचा उपयोग करून कार्यक्षमता कित्येक पटींनी वाढली आहे.