दही की टिक्की
|१) दीड कप दही
२) अर्धा कप डाळीचं पीठ
३) पाव चमचा मीठ
४) पाव चमचा तिखट .
सारणासाठी :-
१) अर्धा नारळ खरवडून
२) वाटीभर वाफवलेले मटार दाणे
३) आवडीप्रमाणे काजू
४) बेदाणे , बदाम
५) अक्रोड यांचा भरडचुरा एक वाटीभर
६) एक चमचा आलं किसून
७) दोन हिरव्या मिरच्या वाटून
८) मुठभर कोथिंबीर चिरून
९) एक चमचा गरम मसाला
१०) अर्ध्या लिंबाचा रस
११) चवीप्रमाणे मीठ व अर्धा चमचा तिखट
कृती :-
१) खोबरं खरपुस भाजावं व सारणाच्या सर्व पदार्थांबरोबर एकत्र करावं . मटार जरा कुस्करून घ्यावा .
२) दरम्यान दही पातळ फडक्यात बांधून चक्क्याप्रमाणे करून घ्यावं . दोन तासांनी पाणी निथळल्यावर त्यात तिखट , मीठ , बेसन घालून मळावं .
३) आता या पीठाचे उंडे करून (खोल वाटी) त्यात एक ते दीड चमचा सारण भरावं व तोंड बंद करून थोडे चपटे करून तव्यावर तेल सोडून दोन्ही खरपूस बदामी रंगावर भाजावं .
thanks friends