दही बुत्ती

 

Curd-Rice

 

साहित्य :- 

१) एक वाटी तांदळाचा नेहमीप्रमाणे शिजवलेला साधा भात 

२) दीड-दोन वाटया गोड दही 

३) एक वाटी दुध 

४) मीठ-साखर 

५) एक मोठा चमचा साजूक तूप किंवा रिफाईंड तेल 

६) एक चमचा जिरं 

५) चार-पाच सांडगी मिरच्या 

६) सात-आठ कढीलिंबाची पानं आणि थोडी कोथिंबीर .

कृती :- 

१) भातात दही , दुध , साखर , मीठ घालून भात मऊसर कालवावा . 

२) तुपात किंवा तेलात जिरं , कढीपत्ता आणि सांगडी मिरच्या परतून घ्याव्या .  

३) मिरच्या जरा कुस्कराव्या आणि ती फोडणी भातात मिसळावी .  

४) कोथिंबीर घालून भात वाढवा . 

५) हा भात प्रवासात न्यायला सोयीचा पडतो .

६) अशा वेळी दुध जास्त घालून दह्याचं प्रमाण कमी करावं म्हणजे भात फार कोरडा होत नाही .