दही वडे

dahi vadaसाहित्य :-

१)      दोन वाटया उडदाची डाळ

२)     पाव वाटी मुगाची डाळ

३)     तळण्यासाठी तेल

४)     चवीनुसार मीठ .

दही असं तयार करा :-

१)      एक लिटर दुध , पाव वाटी कॉर्न फ्लॉवर , एक मोठा चमचा मिल्क पावडर .  एक लिटर दुधामधील एक वाटी दुध बाजूला काढा .

२)     त्यात कॉर्न फ्लॉवर , मिल्क पावडर घालून पेस्ट तयार करून घ्या .  बाकीचं दुध उकळायला लागलं की ही पेस्ट दुधात ओता .

३)     सतत ढवळत राहून पाच ते सहा मिनिटं उकळू दया .  कोमट झाल्यावर नेहमीप्रमाणे विरजण घाला .  साधारण आठ तासात विरजण लागतं .

कृती :-

१)      उडदाची डाळ स्वच्छ धुवून भरपूर पाण्यात चार तास भिजवा , झाकून ठेवा .

२)     कमीत कमी पाणी घालून अगदी गंधाप्रमाणे होईपर्यंत मिक्सरमध्ये फिरवून काढा .

३)     गरम तेलात वडे तळा .  पाण्यात टाकून पिळा , दह्यात टाका .

४)     दही रवीनं घुसळा .  त्यात मीठ , साखर , आल्याचा कीस , कोथिंबीर टाका .  पाण्यातून काढलेले वडे दह्यात टाका .