दागिन्यांचे सौंदर्य

Jewelleryमहिलांना मुळातच नटण्याथटण्याची आवड़ त्यात काही सणावारांचे निमित्त नटण्यासाठी त्यांना पुरेसे असते. पण दागिने बर्‍याच काळ ठेवून दिले असतील तर त्यांची चमक कमी होते. त्या दागिन्यांना चमकवण्यासाठी सखींना या काही मोलाच्या टिप्स. हिर्‍याचे दागिने टूथपेस्टने साफ करावेत. यामुळे चमक वाढते. रिठय़ाच्या पाण्याने दागिने साफ केल्यासही चमक वाढते. खड्यांचे दागिने कापसाने साफ करावेत. मोत्याच्या आणि खड्याच्या दागिन्यांना पाणी किंवा घाम लागू देऊ नये. यामुळे मोती किंवा खडे काळे पडतात. सोन्याच्या दागिन्यांना टूथपेस्ट लावून थोड्या वेळानंतर हलक्या हाताने घासावेत. त्यानंतर हळद टाकलेल्या मिठाच्या पाण्यात काही काळ दागिने भिजत ठेवावेत. यामुळे चमक वाढते. मोत्याचे दागिने तांदळाच्या पिठानेही स्वच्छ करतात. यामुळेही दागिन्यांची चमक वाढते. मोत्याचे दागिने अधिक चमकदार दिसण्यासाठी त्यावर पारदर्शक नेलपेंटचा थर लावावा. यामुळेही चमक वाढते.