दिवस लग्न सराईचे …. !
|

खासकरून महाराष्ट्रा मधील लग्न कार्यांना ह्या महिन्यात विशेष उधान आलेलं असत.
महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये विशिष्ट जातीचा समुदाय राहतो,त्यामुळे वधु-वर शोधणे फारसे जिकरीचे जात नाही,
त्यामुळे सोयरीक जमवुन गावातच लग्न विधी आटोपला जातो सबंध नातलगां समवेत.
प्रत्येक गावात लग्न कार्य जणु उत्सवा सारखंच भासतं.
वाजंत्री,मंडप वाले,आचारी,फोटोग्राफर,मंगल कार्यालये,ब्राम्हण ह्यांची चांदी आणि रोजगाराच प्रभावी साधन असते लग्न सराई
करवलींच्या नटण्या थटण्याचा मोसम असतो लग्न सराई,नवऱ्या मुलांकडच्या नातलगांना विशेष सन्मान देते लग्न सराई,मुळात दोन जीवांना संसाराची समाज मान्यता देते लग्न सराई.
प्रत्येकाच्या घरी लग्न पत्रिकांचा ढीग साचला असेल…….
त्यामुळे कुठल्या लग्नाचे नियोजन तुम्ही कसे करता ह्याला विशेष महत्व असते.