दुधीचं धिरडं

साहित्य :-DoodhiParatha

१)      एक वाटी तांदळाचं पीठ

२)     अर्धी वाटी बेसन

३)     चिमुटभर मेथी पूड

४)     अर्धा चमचा धने-बडीशेप पूड

५)    एक वाटी दुधीचा कीस

६)      एक वाटी दुध

७)    पाव वाटी पाणी

८)     एक चमचा हिरव्या मिरचीचे काप

९)      चवीनुसार मीठ .

कृती :-

१)      धिरडं करण्यासाठी बीडचा किंवा जाड लोखंडाचा तवा तापत ठेवावा .  सर्व साहित्य   एकजीव करून घ्याव्या . 

२)     तवा तापला की नारळाची शेंडीने तव्याला तेल लावून घ्यावं .  जेणे करून धिरडी चिकटणार नाही .    

३)     एक चमचाभर पीठ घालून पीठ तव्यावर पसरून किंचित तेल सोडून झाकण  ठेवावं .  चर्र आवाज आला की धिरडं उलटावं . 

४)     नीट उलटलं गेलं आणि जरा जाड वाटलं तर थोडं पाणी घाला .  एकदा जमलं की तवाभर धिरडं करता येतं .

3 Comments

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *