दुर्गंधीयुक्त घामापासून सुटका होण्यासाठी..

घाम     अधिक मेहनत केल्याने अथवा भर उन्हात फिरल्याने अंगाला घाम येणारच. मात्र तरीही काही व्यक्तींना घाम येण्याचे प्रमाण इतरांपेक्षा जास्त असते आणि त्यामुळे घामाची दुर्गंधी देखील पसरते. वयात येईपर्यंत मुलांच्या घामाला कुठलाही वास नसतो.वयात आल्यानंतर विशिष्ट स्वरूपाचा वास सुरू होतो.  काहींमध्ये ही दुर्गंधी इतक्या मोठय़ा प्रमाणावर येते की  चारचौघात मान खाली घालावी लागते.यासाठी काहीघरगुती उपचार पुढीलप्रमाणे…..

१)       भरपूर पाणी प्यावे, पोट साफ ठेवावे.

२)     नियमितपणेदिवसातून दोन वेळा आंघोळ करावी.आंघोळीच्या पाण्यात सुगंधी द्रव्यांचा जसे गुलाब पाण्याचे  चार ते पाच थेंब, डेटॉल, युडीकोलोनचा वापर करावा.आंघोळीनंतर डिओड्रंट, पावडरचा वापर केल्यास अधिकफायदेशीर ठरते.

३)     शक्यतो अधिक घाम येईल, अशा कपड्यांचा वापर करूनये. परिधान केलेले कपडे, हातरुमालावर सुगंधी द्रव्यांचावापर करावा.

४)     घाम त्वचेवर साचून राहिल्यास विविध आजार होण्याचीशक्यता असते. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.