दुर्गभ्रमंती- किल्ले “‘कोंढाणा’

 

सिंहगड -(कोंढाणा’)kondana

सिंहगडहा किल्ला  पुण्यापासून फक्त २४ कि. मी. अंतरावर आहे. नरवीरतानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाने पावन झालेला सिंहगडाचे पूर्वीचे नावकोंढाणाहोते. इ. स. १६७० मध्ये नरवीर तानाजी मालुसरे यांनी स्वत:चेबलिदान देऊन हा किल्ला  स्वराज्यात दाखल केला. त्या वेळी छत्रपती शिवाजीमहाराजांनी तानाजीबद्दल गड आला पण सिंह गेलाअसे उद्गार काढले.तेव्हापासून कोंढाण्याचे नाव सिंहगड झाले.

समुद्रसपाटीपासून सुमारे८०० मी. उंचीवर हा किल्ला  आहे. गडावर नरवीर तानाजींची समाधी, कल्याणदरवाजा, राजारामांची समाधी, अमृतेश्वर मंदिर इ. महत्त्वाच्या ऐतिहासिकवास्तू आहेत. त्याचबरोबर लोकमान्य टिळकांचा बंगलाही गडावर आहे. पेशवाईच्याकाळात कैद्यांना ठेवण्यासाठी या गडाचा उपयोग केला जात असे. लोकमान्य टिळकचिंतन-मनन, अभ्यास व लेखनासाठी, तसेच विश्रांतीसाठी सिंहगडावर वारंवार येतअसत. शिवकाळ – पेशवाई – स्वातंत्र्य लढा या तिन्ही काळात हा महत्त्वाचाहोता. गडावरून खडकवासला धरण, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (नॅशनल डिफेन्सअॅकॅडमीचे) दृश्य पाहावयास मिळते. पुणे शहराच्या अगदी जवळ असा हा किल्ला  असल्यामुळे येथे पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. पण हल्ली हा ऐतिहासिक दुर्ग प्रेमी युगलांच्या एकांतच ठिकाण झाला आहे