दुर्गभ्रमंती- किल्ले “ देवगिरी”

देवगिरी –devgiri
या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे एवढ्या वर्षात कोणाही स्वारी करणार्‍या राजाला तो लढून जिंकता आला नाही.
महम्मद तुघलकने या देवगिरीचे दौलताबाद’ नाव केले. १५२६ पर्यंत इथे बहामनी सत्ता होती. त्यानंतर औरंगजेबच्या मृत्यूपर्यंत (१७०७) हा किल्ला  ‘मुघलांकडे’ होता. यादवांनी बांधलेल्या देवगिरी किल्ल्यासारखा संपूर्ण महाराष्ट्रात किल्ला  नाही. सुमारे २०० मी. उंचीवर हा किल्ला  आहे. किल्ल्याला ७ वेशी असून २ कि.मी. लांबीचा अभेद्य तट आहे. किल्ल्यावर एक उंच स्तंभ आहेत्याचबरोबर हत्ती हौदभारतमातेचे मंदिरचिनी महालमीठ अंधेरी मार्गखंदक इ अनेक ऐतिहासिक वास्तू या किल्ल्यात आहेत. दिल्लीच्या कुतुबमिनारची आठवण करून देणारा निरीक्षणासाठीचा मनोरा हे एक वैशिष्ट्य येथे बघता येते. संत एकनाथ यांचे गुरू जनार्दन स्वामी यांची समाधी याच किल्ल्यावर आहे. 


औरंगाबादपासून फक्त १३ कि. मी. अंतरावर हा किल्ला  आहे.  औरंगाबादपासून वाहनांची व्यवस्था उत्तम प्रकारे आहे. जवळच अजिंठा-वेरुळच्या लेणीघृष्णेश्र्वर मंदिर ही ठिकाणे आहेत.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *