दुर्गभ्रमंती- किल्ले “ लोहगड”

लोहगडlohagad
पुण्यापासून जवळच असलेला लोहगड हा किल्ला  अनेक पर्यटकांचेआकर्षण बनला आहे. लोहगड हा भक्कम किल्ला  आहे. गडाची उंची समुद्रसपाटीपासूनसाधारणत: १०२४ मी. आहे. गडावर प्रसन्न वातावरण आहे. गडावर असणार्‍या दाटजंगलामुळे येथील वातावरण खूपच थंड असते.

गडाची रचना ही प्राचीन असावी असे वाटते. इ.स. १६४८ मध्ये शिवाजी महाराजांनीहा गड जिंकून घेतला. पण पुरंदरच्या तहाच्या वेळी हा किल्ला  परत मोगलांकडेगेला. शेवटी १६७० मध्ये हा किल्ला  पुन्हा मराठ्यांनी जिंकला.

लोहगडावर अनेक ऐतिहासिक वास्तू पाहण्यासारख्या आहेत. तसेचगडावरून अनेक निसर्गरम्य ठिकाणे पाहण्यास मिळतात. गडाच्या पायथ्याशीचप्रसिद्ध अशा कार्ले लेणी आहेत. मळवली स्टेशनपासून विसापूर व लोहगड हे दोनकिल्ले दिसतात. राजा रविवर्मांनी सुरू केलेली भारतातील पहिली ‘लिथोप्रेस’ ही गडापासून जवळच आहे. कार्ला येथे पर्यटक निवास आहे.