दुर्गभ्रमंती- किल्ले “शिवनेरी “
|१९ फेब्रुवारी १६३० रोजी,अवघ्या महाराष्ट्राचा तारणहार जन्माला आला,रयतेच्या कल्याणासाठी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या छत्रपति शिवरायांच्या जन्माच स्थान म्हणुन किल्ले शिवनेरीची वेगळी ओळख आहे
छत्रपतीशिवाजी महाराजांच्या जन्मामुळे ‘शिवनेरी’ किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळेच अन् अढळ स्थान आहे. शिवनेरी किल्ला सुमारे १०७० मीटरउंच असून दक्षिण – उत्तर दीड किलोमीटर पसरलेला आहे. किल्ल्याचा दक्षिणेकडीलभाग अर्धगोलाकृती आहे, तर उत्तरेकडे तो निमुळता होत गेला आहे.
शिवनेरीकिल्ल्यावर शिवरायांचा जन्म झाला ती वास्तू, शिवाई मंदिर, हत्ती दरवाजा, शिवबाई दरवाजा, बदामी तलाव इत्यादी ऐतिहासिक ठिकाणे आहेत. गडावरील शिवाईदेवीच्या नावावरूनच जिजाऊंनी छत्रपतींचे नाव ‘शिवाजी’ ठेवले, असे म्हटलेजाते. याचबरोबर गंगा-जमुना नावाच्या गार पाण्याच्या दोन मोठ्या ‘टाक्या’ आहेत. किल्ल्याच्या आसपास बौद्ध लेणी असलेल्या तीन डोंगराच्या रांगा आहेत.
अलीकडेचमहाराष्ट्र शासनाने किल्ल्यावर एक भव्य मंडप बांधला असून त्यास ‘शिवकुंज’ असे नाव दिले आहे. त्यामध्ये सिंहारूढ असलेल्या ‘मातोश्री जिजाबाई’ व तलवारघेऊन बसलेले बाल शिवाजी यांची पंचधातूची सुंदर मूर्ती स्थापित केली आहे.शिवनेरी हा किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असून पुण्याहून ९४कि. मी. एवढ्या अंतरावर आहे. गडावर भोजन व निवासाची व्यवस्था आहे.