धनगर आरक्षण
|
राज्यात धनगर समाजाचे आरक्षणासाठी आंदोलन सुरू झाले आहे. या आरक्षणाच्या मागणीला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पाठिंबा आहे. आदिवासी कल्याण मंत्री मधुकर पिचड यांचे वेगळे वक्तव्य प्रसिद्ध झाले. धनगर आरक्षण कृती समितीने बारामतीत धरणे आंदोलन केले. कृती समितीचे अध्यक्ष हनुमंत सूळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी यासंदर्भात निवेदन दिले. “धनगड‘ हा शब्द बदलून तेथे “धनगर‘ शब्द लिहावा, ते दोन्ही एकच आहेत, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही निवेदन दिले.
आदिवासी समाजासाठी असलेल्या आरक्षणाला धक्का लावायचा नाही. धनगर समाजासाठी वेगळे आरक्षण ठेवायचे. त्यामुळे आदिवासी व धनगर यांच्यात अकारण निर्माण झालेला गैरसमज संपला. धनगर समाजाचे आरक्षण तिसऱ्या अनुसूचित घालण्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पाठिंबा नाही, त्यांचे नाव पहिल्या सूचीत घातले पाहिजे. पहिल्या अनुसूचित प्रथम क्रमांक आदिवासींना द्या, दुसरा क्रमांक धनगर समाजाला द्यावा.
आदिवासी समाजाला नोकरी, आर्थिक, शिक्षण व राजकीय आरक्षण मिळते; तेच आरक्षण धनगर समाजाला मिळावे, ही राष्ट्रवादी कॉंग्रेसची भूमिका आहे.‘‘