धन्य ती जिजाई
|ज्यास लाभली माय जिजाई
हि स्फूर्तीदायी हि रणचंडी
हि साक्षात शिवाजी
जिजाऊच्या रूपे स्वत्रांत्याची पहाट झाली.
स्वातंत्र्य सूर्य उषा दारी घेवून आली
राज्य संपले ते तिमिराचे
सरली यवन रजनी
हि कुलकन्या यादवांची
स्नुषा शोभली रघुकुलांची
हि वीरकन्या लाखुजीची
नांदली विरप्प्नी राजे शहाजीची
ऐसा पुत्र दे माझ्या ओटी
संहारील जो दुष्टांना
घातले साकडे जिजाईला
अन पुत्र झाला जणू राम जन्माला
आज राघुकुलाला
बाळ शिवबा खेळत नव्हता
खेळ चिवू कावू चे
माय जिजाऊ खेयून घेते
खेळ मार्दानीचे
बाल शिवाजी उमगत गेला
जशास तसे आचार ठेवला.
खानास मग जीवे मारला
खल जनाचा संहार केला
जेष्ठाच्या या शुध्द मारती
लाडका पुत्र शिवाजी राजा झाला
कृतार्थ तेचा हा अपूर्व सोहळा
आई जिजाईनी देविला
जीवन भरी अपुर्णी नीज प्रेमाला
अकराव्या रिनी गमन केले
सहर्ष कैलास लोकाला
दुखी सह्यागिरी,दुखी अवनी
दुख वेधिले त्रेलोभ्याला
शिवबाची नव स्वातंत्र्याची हि जन्मदात्री
हि स्फुत्रीदात्री हि रणचंडी ,हि साक्षात शिवाई .
– कीर्ती नरेंद्र देवरे