धर्मांतर …!!!!!

hinduमला अतिशय आनंद होत आहे की , … “हिंदू धर्मा ” विषयी आजच्या हिंदुस्थानी तरुण पिढीचे विचार किती प्रखर आहेत …! तरुण पीढ़ी आपला “हिन्दू धर्म म्हणजे नेमके काय ? याचा अतिशय अभ्यासपूर्ण आकलन करुन… आज आपला धर्म -ह्रास पावत आहे , हिंदूंचे धर्मांतर होत आहे … हे पाहून … नुसती पेटून उठली आहेत ……!

मला माझ्या हिंदू असण्याचा प्रचंड अभिमान आहे ….! कारण हिन्दू धर्म हा याच्या त्याच्या विचारांची आदान प्रदान करून निर्माण झालेला नाही ” हिंदू धर्म ‘ स्वयंसिद्ध” , “स्वयंभू” आहे . ! “हिन्दू धर्माचे प्राचीन नाव “वैदिक धर्म ” आहे . म्हणजेच वेदांवर आधारलेला धर्म ! वेद हे सम्पूर्ण जगातील प्राचीनतम ग्रंथ आहेत ! वेद म्हणजे हजारो मंत्रांचा संग्रह ! आणि ज्यांना ते उत्स्फूर्तपणे स्फुरले,दिसले, शोध लावला … त्यांचा साक्षात्कार करुन घेतला आणि ज्यांच्या मुखातून प्रकट झाले,त्यांना आपण “ऋषी” म्हणतो !

मुळात “धर्म ” म्हणजे जगण्याची , जगवण्याची एक निति, आचरण …! “हिन्दू धर्मात अध्यात्माला-धार्मिकतेला ( कर्म कांड नव्हे ) अनन्य साधारण महत्व आहे …! आणि जिथे धार्मिकता येते , अध्यात्म येते तिथे सहिष्णुता , बंधुता , प्रेम, मानवता येते …! आणि तोच खरा हिन्दू धर्म आहे .! ज्याच्या ठायी हे सारे आहे तोच खरा “हिंदू ” ! स्वामी विवेकानंद यांनीही “राष्ट्रीय एकात्मता ” साधायची असेल तर विखुरलेल्या अध्यात्मिक शक्तींचे एकीकरण करावे लागेल … ! आपण सारे अध्यात्मिक वृत्तीचे झाल्याशिवाय भारताचे पुरुजजीवन होणार नाही .! एवढेच नव्हे तर यावर सर्व जगाचे हित आहे .! असे सांगितले आहे !

आपल्या हिन्दुस्थान वर अनेक परकियांची आक्रमणे झाली …! त्यामुळे अनेक संक्रमणे झाली … आणि तरीही आपला हिन्दू धर्म अजूनही अभेद्य आहे …! त्याने अनेक नव्या धर्माना एक विचार दिला .! जगातील सर्व धर्मांचा “पाया” हिन्दू धर्म आहे …! आणि म्हणूनच प्रत्येक धर्मात “ईश्वराची” व्याख्या , त्याच्या पर्यंत पोहचन्याचा मार्ग एकच सांगितलेला आहे !

आज अस्तित्वात असलेला प्रत्येक धर्म आप आपल्या चांगल्या वाइट पद्धतीने आपला धर्मं वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे …! पण तो कसा आणि कशासाठी याचा शोध कोणी घेतला आहे का …? “श्री कृष्णाने धर्मयुद्ध घडवले ….! पण ते कोणा विरुद्ध ….? ज्यांच्याशी धर्मयुद्ध करण्यासाठी श्रीकृष्णाने अर्जुनाला “गीते चे ” दिव्य dnyaan, तत्वदन्यान् दिले … ते कोण होते …. ? कोणत्या धर्माचे होते ….? श्रीकृष्णाने नेमक्या कोणत्या धर्मासाठी धर्मयुद्ध केले …? त्या महायुद्धात , धर्मयुद्धात जे लढले … मारले गेले … ! ते एकमेकांचे पिता, बंधू , सखा होते …! “गीते मधील वर्णन असे आहे “पृथ्वीतलावर एकूणच धर्माचा -हास होउ लागला . नीति नियम सोडून आसुरी वृत्ति वाढली . अत्याचार वाढला । तेंव्हा श्री विष्णुना ” श्रीकृष्णाच्या रुपात अवतार घ्यावा लागला …!

आज जगातील वाढलेल्या त्याच अत्याचारी , आसुरी, निर्दयी शक्तींचा, वॄत्तिंचा नाश करायचा आहे ….! न कि कुठल्याही धर्माच्या असुयेने ,मत्सराने दंगली, युद्ध करून विशिष्ट पंथातील-धर्मातील निष्पाप माणसांचा, अबालवृद्धांचा नाश करायचा …! हिन्दू धर्माचा …अर्थात “हिन्दू धर्मात अवघ्या मानव जातीच्या कल्याणासाठी कोणते विचार दिले आहे त्यांचा प्रसार करा …! आपल्याला विचारी हिन्दू हवेत …अविचारी “जिहादी” नकोत …! आपला हिन्दू धर्म डोळस असावा आंधळा नको ! जबरदस्तीने , लोभाने , भीतीने , अनीतिने हिन्दू धर्मं स्वीकारणारे हिन्दू अनुयायी नकोत …! आपल्याला अंत:करनाने हिन्दू झालेले हिन्दू हवेत ….! ” स्वामी विवेकानंद ” यांनी जगभर आपल्या हिन्दू धर्माचा जो डोळस प्रचार केला …! तसा प्रचार करणे आजच्या तरुण पिढीचे परम कर्तव्य आहे …! हिन्दू धर्म नेमका काय आहे याचे खरे स्वरुप काय आहे हे जगाला सांगून पटवून दया .! शिवाजी महाराज परकियांशी लढले तसे नीतिनियम तोडणा-या स्वकीयांनाही त्यांनी सोडले नाही …! श्रीराम यांनी “रावणाशी धर्मयुद्ध केले” पण एका स्त्रीच्या आपल्या पत्नीच्या स्वाभिमानसाठी ….! ते रावणाच्या आसुरी शक्ति विरुद्ध लढले …! रावणाचा सख्खा भाउ विभीषण श्रीरामा कडून लढला ! … का …….?

आज प्रत्येक खरा हिन्दू पेटून उठणारच …. कारण त्यांच्या धर्मात दिलेल्या नीतिनियमांचा। -हास होत आहे …! हे त्याला पहावत नाही … पण त्याचा -हास रोखायचा असेल तर मुळात आपण परकियांचे अंधानुकरण करणे थांबविले पाहिजे …! आपली परंपरा , संस्कृति, संस्कार, ह्या आपल्या घरापासून जपल्या पाहिजेत …! दु स-यांना सांगण्या आधी स्वत: त्यांचे आचरण करा ….! आधी करा नंतर बोला ….! हिन्दू धर्मं प्रत्येकाच्या श्वासा श्वासात पाहिजे … ! आपल्या भारतीयांची ती ओळख आहे ! आणि ही आपली ओळख जगात कुठेही गेलात तरी सांगायला, दाखवायला लाजु नका …! चला उठा हिन्दू धर्म वाचवा …! हिन्दू धर्म वाढवा ……! हे विचार खुप मवाळ वाटतील …! पण जर आपल्या हिन्दुस्थानवर कोणत्याही दुस-या जिहादी किंवा अन्य शक्तिनी आक्रमण केले तर प्रत्येक हिन्दुस्तानी त्याच्यावर तुटून पडलाच पाहिजे …! मग तिथे मला” गांधी निती ” नको” स्वातंत्र्यवीर सावरकरांची हिन्दुस्तानी राष्ट्रनीति पाहिजे ” …!!!

” समिधा “

3 Comments

Leave a Reply to Ratnakar Khandagale Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *