धोनीला सैन्यदलात जाण्याची इच्छा होती….

Dhoniभारतीय युवकांमध्ये यश आणि स्टाइल चा पर्याय बनलेला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला प्रत्यक्ष जीवनात क्रिकेटपटू नाही तर ‘सैनिक’ बनण्याची इच्छा होती. रांची येथे पैराशूट रेजिमेंट च्या एकदिवसीय सराव प्रशिक्षण शिबिरादरम्यान सैनिकांच्या परिवाराशी गप्पा मारतांना धोनीने स्वतःच आपली इच्छा बोलून दाखविली. भारतीय सैन्यदलातील लेफ्टिनेंट कर्नल ची उपाधी मिरविणाऱ्या कर्णधार धोनी म्हणाला कि, ‘लहानपणी मला सैन्यदलात जाण्याची इच्छा होती. सानिकांकडे बघून मला वाटे कि मीही त्यांच्यासारखेच बनावे, मात्र प्रत्यक्षात तसे होऊ नाही शकले. सैनिकांच्या पोषाखाकडे पाहिल्यावर माझी सारी भीती नाहीशी होत असे. म्हणूनच हा पोशाख माझ्यासाठी खास आहे. मैदानात नेहमी शांतचित्ताने वावरणाऱ्या धोनीला जेव्हा प्रश्न विचारण्यात आला की तो तणावापासून स्वतःचा बचाव कसा करतो? ह्या प्रश्नावर काहीशा मिश्किलपणे उत्तर देतांना धोनीने सांगितले की, जेव्हा मला एखाद्या पत्रकार परिषदेसाठी जायाचे असते, त्याच्या आदल्या रात्री फ्रीजमध्ये बसलेला असतो. ज्यामुळे मला कुठलाही प्रश्न विचारला गेल्यावर शांत राहण्यास मदत होते.        

 

धोनीच्या नेतृत्वात टीम इंडिया ने टी20 विश्‍वचषक, एकदिवसीय विश्‍वचषक, चैम्पियंस ट्रॉफी जिंकलेली असून, टीम इंडियाने टेस्ट क्रिकेट मध्ये सर्वोच्च स्थानही पटकावले आहे. त्याच्या कर्णधर्पदाच्या पहिल्याच वर्षी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात खेळली गेलेली कॉमन वेल्‍थ बैंक सीरीज जिंकली,ज्यात एकापाठोपाठ दोन अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत केले.