नखांची अशी घ्या काळजी..!

   images       नखं म्हणजे आपल्या शरीरावरील निर्जीव मात्र नियमित वाढणारे भाग. थोडी जास्त वाढली तर आपण स्वतःच ती कापून टाकत असतो. मात्र, जेवण करतांना नखे नापालता तोंडात जातात तसेच कान, डोळे नाक अशा शरीराच्या अन्य नाजूक अवयवांशीहि नखांचा संपर्क होत असल्याने त्यांची योग्य निगा घेणे अत्यावश्यक आहे. त्याकरीता काही उपयोगी माहिती पुढीलप्रमाणे,

१)        नखं वाढवायची असल्यात त्यात मळ साचणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच ‘नेल हार्डनर’ लोशनचा वापर करावा. त्यामुळे नखे लवकर तुटत नाहीत.

२)      दररोज ओला कापूस किमान दहा मिनिटे नखांवर ठेवल्यास फायदा होतो.

३)      नखांचे पुढचे टोक अगदी त्वचेच्या जवळ कापू नये. त्वचेपासून अर्धा किंवा एक मी.मी. नख राहिल्या बरे.

४)      नखाच्या मागचे चामडे कुठल्याही टोकदार वस्तूनेमागे ढकलू नये.

५)      टोकदार किंवा पुढच्या बाजुने निमूळते असलेले बूट घालू नये. यामुळे पायाच्या नखांना इजा होवून ते बोटांमध्ये रूतण्याचा धोका असतो.

६)       नखांना दहा मिनिटे लिंबाच्या पाण्यात बुडवून ठेवावे व मग नखांना आकार द्यावा.

७)      नखे वाढवली असतील तर नियमितपणे ती स्वच्छ करणे आवश्यक आहे.

८)      लिंबाची साल नखांवर घासावी. यामुळे नखे तुटण्याचे प्रमाण कमी होईल. तळहात, बोटे, नखे यांना दुधावरच्या सायीने मसाज करावा. यामुळे चकाकी प्राप्त होईल.

९)       तळहात, बोटे यांना महिन्यातून एकदा दही व बेसन यांचा लेप लावावा.