नरक चतुर्दशी…..

    indexभारतीय संस्कृतीत दिवाळीच्या सणाला अनन्यसाधारण महत्व आहे! अश्विन वद्य द्वादशीला ‘वसुबारस’ पासून हा उत्सव साजरा केला जातो. ह्या दिवशी गाय-वासराची मनोभावे पूजा केली जाते तसेच त्यांना मिष्टान्नहि खाऊ घातले जाते. त्यानंतर त्रयोदशीला ‘धनत्रयोदशी’ साजरी केली जाते. ह्या दिवशी घरातील धन-धान्याची पूजा केली जाते. त्यानंतर येणारी चतुर्दशी म्हणजेच ‘नरक चतुर्दशी’! नरक चतुर्दशीला ‘छोटी दिवाळी’ही म्हटले जाते.ह्या दिवशी पहाटे अभ्यंग स्नान करून यम तर्पण आणि सायंकाळी दीपदान करण्याला विशेष महत्व आहे!
     पुराणातील कथेनुसार ह्या दिवशी द्वापारयुगातील भगवान श्रीकृष्णाने सोळा हजार मुलींना बंदी करून ठेवलेल्या नरकासुर नामक राक्षसाचा वध केला होता.नरकासुराचा वध करून भगवान श्रीकृष्णाने त्या सोळा हजार मुलींना नरकासुराच्या तावडीतून मुक्त केले. मात्र ह्या सर्व मुलींनी भगवान श्रीकृष्णाकडे निनावणी केली कि समाज त्यांच्यापैकी कुणाचाही स्वीकार करणार नाही, तेव्हा श्रीकृष्णानेच यावर काहीतरी उपाय योजावा! समाजात ह्या मुलींना मनाचे स्थान मिळवून देण्याकरिता सत्याभामाच्या मदतीने स्वतः भगवान श्रीकृष्णाने त्या सर्व मुलींशी विवाह केला. नरकासुराचा वध आणि त्याच्या तावडीतून १६ हजार मुलींच्या बंधनमुक्त होण्याच्या ह्या पवित्र घटनेपासून हा दिवस नरक चतुर्दशी म्हणून साजरा होऊ लागला तसेच दीपदानाची परंपराही सुरु झाली.

     एका अन्य आख्यायिकेनुसार नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे स्नान करून यमराजाची पूजा आणि सायंकाळी दीपदान केल्याने नरक यातना तसेच अकाल मृत्यूची भीती दूर होते. यामुळे या दिवशी दीपदान आणि पूजेचे विशेष महत्व आहे!

     सर्वांना आजच्या नरकचतुर्दशी आणि दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!